“उद्या मी अर्ज भरणार, त्याआधी पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची भेट घेतली”
मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत उद्या राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी संजय राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उद्या मी अर्ज भरणार आहे. त्याआधी पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची भेट घेतली. राज्यसभेच्या अनुशंगाने पवार यांच्याशी चर्चा झाली. शिवसेनेचा सहावा उमेदवार विजयी होईल यावर शरद पवार ठाम आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या निवास्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. शरद पवार हे राज्याचे तसेच देशाचे एक उत्तुंग नेतृत्व आहे. या सरकारचा ते आधारस्तंभ आहेत, असं शरद पवार म्हणालेत.
आम्ही कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही. आमच्या वाटणीची जागा आम्ही छत्रपतींना द्यायला तयार झालो. याला पाठीत खंजीर खुपसणे म्हणतात का? कुणी काहीही बोलत असेल तर जरा जपून बोला, असा इशारा संजय राऊतांनी दिलाय.
थोडक्यात बातम्या-
ओबीसी आरक्षणप्रश्नी शरद पवारांची केंद्राकडे मोठी मागणी!
मंकी पॉक्सबाबत राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती
“यापुढे जर कोणत्याही घटनेत शरद पवारांचं नाव गोवण्याचा प्रयत्न केला तर…”
ज्ञानवापी प्रकरणावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“मी पुन्हा येईन हे खरं करुन दाखवू, ते ही ब्रह्मदेवास चुकवून”
Comments are closed.