बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवारांना आम्ही राजकारणातले भीष्म पितामह म्हणून पाहतो”

नवी दिल्ली | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जवळपास अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यानंतर त्या सोनिया गांधी, शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भेटीगाठी व्हायला हव्यात. यातून विरोधी पक्षाच्या ऐक्यावर एकमत होऊ शकेल का यावर चर्चा करणं गरजेचं आहे. ममता बॅनर्जी सोनिया गांघींना भेटत असतील तर चांगलंच आहे. विरोधी पक्षाची एकजूट ही काँग्रेसशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज भेटत आहेत. पवार अनेकांना भेटत असतात. पवारांना आम्ही राजकारणातले भीष्म पितामह म्हणून पाहतो. सर्वांना एकत्र करण्याची क्षमता आणि ताकद आणि संवादाची कसब पवारांकडे नक्कीच आहे, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्याआधी ममता बॅनर्जींनी काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.

थोडक्यात बातम्या-

भारताचे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन!

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

‘ए तु थांब रे… मध्ये बोलू नको’; नारायण राणेंनी दरेकरांना झापलं, पाहा व्हिडीओ

पोस्टाची बंपर योजना; सेव्हिंग अकाऊंटवर मिळतंय बँकांपेक्षा जास्त व्याज

येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर समर्थकाची आत्महत्या; शातंता राखण्याचं आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More