बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवारांचं महत्व वाढवण्याची काय गरज, पवारांचा सल्ला मोदीही घेतात”

मुंबई | राजधानी दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी मॅरेथॉन बैठका सुरु आहे. भाजपविरोधी आघाडीची मोठी चर्चा आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांचं महत्व वाढवण्याची काय गरज आहे, त्यांचा सल्ला तर खुद्द देशाचे पंतप्रधान, भाजपचे देशातील प्रमुख नेते घेतात. भाजपने विनाकारण आरोप करु नये, असं संजय राऊत म्हणाले.

काश्मिरला अमन आणि शांततेची गरजेची आहे. गुपकार नेते आणि पंतप्रधान मोदी यांची बैठक झाली ती गरजेची आहे. गोळीसोबत बोलीही हवी. प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी आज ईडीने छापेमारी केली. ईडीने केलेल्या या कारवाईवर  संजय राऊत संताप व्यक्त केला आहे. तसेच यावरून राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सीबीआय, ईडी काय तुमची कार्यकर्ती आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी भाजपला केला आहे.

अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी ईडीने छापेमारी केली. मला वाटतं हे सगळं सत्ताप्रेरित आहे. सीबीआय, ईडी काय तुमची कार्यकर्ता आहे का , ईडी आणि सीबीआयची बदनामी होतेय, हे संबंधितांनी लक्षात घ्यावं. प्रताप सरनाईक यांच्याबाबतीतही तेच झालं. अशा गोष्टींमुळे विनाकारण त्रास होतो, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

“पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं वागणं मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला तडा देणारं”

‘झेपत नसेल तर राजीनामा द्या’; खासदार सुप्रिया सुळेंनी मुरलीधर मोहोळ यांना सुनावलं

सीबीआय, ईडी काय तुमची कार्यकर्ती आहे का?- संजय राऊत

“माझ्याशिवाय आणीबाणी कोणालाच कळणार नाही”

शाळा सुरू करण्याचं धाडस करताना विचार करावा लागेल- बच्चू कडू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More