मुंबई | शरद पवार सिर्फ नामही काफी है. महाराष्ट्राचा हा नेता जेव्हा दिल्लीत उभा राहतो तेव्हा दिल्लीलाही झुकावं लागतं आणि हे आपण दाखवून दिलं आहे, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
विधानपरिषदेचे आमदार आणि लोकभारती प्रमुख कपिल पाटील यांनी मुंबईत मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी शरद पवारांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
आधीच्या सरकारने शिक्षणाच्या आयचा घो केला, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. आयचा घो हा शिवसेनेने संमत केलेला शब्द आहे, असं देखील राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान, पाच वर्षात भाजपने पाठ्यपुस्तकातले धडे आणि इतिहास बदलला त्यामुळे आपण सरकार बदललं. लोकशाहीमध्ये यापेक्षा कोणता मोठा धडा असू शकतो?, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
‘दांडी’ मार्च ते ‘दंडा’ मार! काँग्रेसने चांगलीच प्रगती केली- परेश रावल
शरद पवारांच्या हत्येचा कट, पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल
महत्वाच्या बातम्या-
आधीच्या सरकारने शिक्षणाच्या आयचा घो केला- संजय राऊत
“छ. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात लालसी सरकारने आमच्या भगिनींची सुरक्षा वाऱ्यावर सोडली”
बांधावर जाऊनच शेतकऱ्यांचा आक्रोश कळेल; राजू शेट्टी सरकारवर बरसले
Comments are closed.