“पक्ष फुटलेला बघण्यापेक्षा सन्मानाने निवृत्ती घ्यावी असा विचार पवारांच्या मनात आला असेल”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शरद पवारांनी (Sharad Pawar) निवृत्तीची घोषणा करताच अनेक प्रमुख नेत्यांनी अश्रू ढाळले, आकांत केला. पवारांच्या चरणाशी लोळण घेतली. ‘तुमच्याशिवाय आम्ही कोण? कसे?’ अशी विलापी भाषा केली. पण यापैकी अनेकांचा एक पाय भाजपत आहे आणि पक्ष अशा तऱ्हेने फुटलेला बघण्यापेक्षा सन्मानाने निवृत्ती घ्यावी असा सेक्युलर विचार पवारांच्या मनात आला असेल तर त्यात चुकीचे नाही, असं आजच्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलंय.

पक्षातील ईडी सारख्या तपास यंत्रणामुळे निर्माण झालेली अस्वस्थता आणि त्या अस्वस्थतेतून सहकाऱ्यांनी निवडलेला भाजपचा मार्ग हे कारण राजीनाम्यात असावं. दुसरं कारण म्हणजे, अजित पवार आणि त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अडवण्यासाठी पवारांनी हे पाऊल उचलले काय? असा सवाल ‘सामना’तून करण्यात आला आहे.

नाचा आणि राजीनाम्याचा मसुदा त्यांनी काळजीपूर्वक तयार करून आणला होता. आणि त्यानुसार त्यांनी सर्व काही केले. पवारांच्या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याची ‘सांगता’ अशा काही धक्कादायक प्रकाराने होईल याची पुसटशी कल्पनाही नसावी, असं अग्रलेखात म्हटलंय.

अजित पवारांच्या राजकारणाचे अंतिम ध्येय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे आहे. सुप्रिया सुळे दिल्लीत असतात. त्यांचा तेथील वावर चांगला आहे. संसदेत त्या उत्तम काम करतात, मात्र भविष्यात त्यांना पक्षाचे नेतृत्व मिळाले तर वडिलांची उंची गाठण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, असंही अग्रलेखात म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-