शिंदे सरकार कोसळणार?; ‘या’ बड्या नेत्याचा मोठा दावा

मुंबई | महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) आज महामोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे अनेक नेते सहभागी झालेत. यावेळी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे सरकारवर सडूकन टीका केली आहे.

शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी भाजपवर देखील त्यांनी टीकास्त्र सोडलं. भाजपसारखा मुर्ख पक्ष आजवर पाहिला नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हा मोर्चा सरकार उलथवून टाकण्यासाठीचं पहिल पाऊल आहे, असं संजय राऊत म्हणालेत. राऊतांनी राज्यपालांवर देखील सडकून टीका केली. राज्यपालांना एक मिनिटं सुद्धा खुर्चीवर बसण्याच्या अधिकार नाही, असं राऊत म्हणालेत.

महापुरुषांचा अपमान करणारे मंत्रालयात बसले आहेत हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा अपमान आहे. राज्यातील साडे अकरा कोटी लोक हे सरकार कधी उलथवून टाकणार याची वाट पाहत आहे. हा मोर्चा म्हणजे हे सरकार उलथवून टाकण्यासाठीचं पहिलं पाऊल आहे. गावागावात या सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू आहेत. हे सरकार उलथवून लावण्याची लोक वाट पाहत आहे, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या महामोर्चाला हजारो लोक एकवटले आहेत. या मोर्चात लाखो लोक सहभागी झाले आहेत. सकाळी 10 वाजता भायखळ्यातून निघालेला हा मोर्चा दुपारी 1 वाजता आझाद मैदानात पोहोचला.

महत्त्वाच्या बातम्या-