बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल, पण शिवसैनिकांमध्ये माज पाहिजे- संजय राऊत

अहमदनगर | शिवसेनेत माज असायलाच हवा. कोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल. वाघा सारखे जन्माला आलो, वाघासारखे मरणार, असं वक्तव्य शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊतांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

संजय राऊत यांनी यावेळी बोलाताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर देखील टीका केली. शिवसैनिक कोणत्याही पक्षात गेला तरी त्याची शिवसैनिक हीच ओळख राहते. त्यात काही बदल होत नाही. हा नारायण राणे…तो आमका असं म्हणत नाही. तो शिवसैनिक आहे असंच म्हटलं जातं, असा टोला राऊतांनी राणेंना लगावला आहे.

सत्ता असल्याने आम्ही अधिकाऱ्यांना गडचिरोलिला पाठवू का असा दम देऊ शकतो. सत्ता हा मानसिक आधार आहे. मोदी म्हणतात कैसे हो भाई? याला सत्ता म्हणतात. गुजराती देखील सामना पेपर घेतात, असं राऊतांनी म्हटलंय.

दरम्यान, आमदार आणि खासदार माजी होतो. पण शिवसैनिक कधीच माजी होत नाही, असंही ते म्हणाले. सत्ता हा मानसिक आधार आहे. सत्ता असो वा नसो शिवसेना स्टाईलने अधिकाऱ्यांकडून कामे करून घ्या, असं ते म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘नरेंद्र मोदी चहावाले नाहीतच…’; खुद्द मोदींच्या भावानं फोडलं गुपित

एसटी कर्मचाऱ्यांची दादागिरी; वृद्धाला जबर मारहाण, पाहा व्हिडीओ

एकतर्फी प्रेमातून विवाहितेनं उचललं हे टोकाचं पाऊल!

“भेदभाव न करता मदत करा, मोठाभाऊ म्हणून जबाबदारी घ्या”

मास्टरशेफ संजीव कपूर यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात; दररोज 15 हजार थाळ्या पुरवणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More