बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बाळासाहेबांची शिवसेना आम्ही गगनाला गवसणी घालण्याइतपत मोठी करु”

मुंबई | वाटाघाटी झाली असती तर पुढचा प्रयोग झाला नसता. खेळ तुम्ही संपवला आहात, पण तो संपला असं होत नाही. बाळासाहेबांची शिवसेना ज्वलंत शिवसेना आहे. ती संपवण्याचा प्रयत्न कोणी करु नये. दूर गेलेल्यांनी आपला मार्ग स्वीकारावा. बाळासाहेबांची शिवसेना आम्ही गगनाला गवसणी घालण्याइतपत मोठी करु, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरेंनी काल देशाच्या जनतेशी संवाद साधला. महाराष्ट्रात कशी परिस्थिती निर्माण केली आणि राजीनामा द्यावा लागला हे त्यांनी संयमी आणि सभ्य भाषेत सांगितलं. आपल्याच लोकांनी कशी दगाबाजी केली हेदेखील त्यांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर खुर्चाला चिकटून राहण्यात काही अर्थ नव्हता. कारण ठाकरे कधीही सत्तेचे लोभी नव्हते, असं राऊत म्हणालेत.

राष्ट्रवादीला, काँग्रेसला, शरद पवारांना दोष देत असल्याचं आश्चर्य वाटत आहे. यामधली बऱ्याच जणांचं राजकीय पालनपोषण राष्ट्रवादीत आणि खासकरुन शरद पवारांच्या नेतृत्वाखाली झालं आहे, असंही संजय राऊतांनी सांगितलं आहे.

धनुष्यबाण जिवंत आहे सांगण्यासाठी ट्वीट टाकलं. आज इथे बसलो आहे, शिवसेनेचं मीठ खात आहे आणि 15 मिनिटांनी पळू गेलो ही आमची औलाद नाही. बहुधा उद्या दुपारनंतर मी ईडीसमोर हजर होणार असून भूमिका स्पष्ट करेन, असंही ते म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंसह 14 आमदारांना इशारा 

“चाणक्य आज लाडू खात असतील, सर पण तुमचा सच्चेपणा अधिक काळ टिकून राहिल”

एकाबाजूला ठाकरे सरकार कोसळलं दुसरीकडे बच्चू कडूंना रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट!

महाराष्ट्रात येणारं भाजप सरकार पुढील 25 वर्षे चालेल- देवेंद्र फडणवीस

सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More