बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हवा, पाणी, डोंगर, हॉटेल आपल्या राज्यातही आहे, या इकडे”

मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आमदारांना सुनावलं आहे. तसेच पुन्हा महाराष्ट्रात येण्याचं आवाहन राऊतांनी बंडखोर आमदारांना केलं आहे. हवा, पाणी, डोंगर, हॉटेल आपल्या राज्यातही आहे. या इकडे, असं राऊत म्हणाले.

केंद्राने सुरक्षा पुरवली असली तरी लोकांचा रोष तुम्ही रोखणार कसा?, असा सवालही संजय राऊतांनी आमदारांना केला आहे. तसेच माझ्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढला गेला, असं स्पष्टीकरण राऊतांनी दिलं आहे.

शिवसेनेनं हिंदुत्व कधीही सोडलं नाही आम्ही मृत्यू पत्करू पण शिवसेना पक्ष सोडणार नाही, असं संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं आहे. तसेच भाजपच्या घेराव्यातून बाहेर या, असं ते म्हणालेत.

शरद पवारांनी सांगितलं बहुमत आहे तर कशाला थांबलाय. बहुमत असेल तर महाराष्ट्रात या. हे सगळे विचित्र लोक आहेत. आधी सूरतला गेले नंतर गुवाहाटीला. महाराष्ट्राशी त्यांचा संपर्क तुटलाय, असंही राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन

“राज्यातील हालचाली पाहता काहीही घडू शकतं, त्यामुळे…”

‘मरण आलं तरी बेहत्तर पण…’; एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट चर्चेत

‘जर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर…’; बंडखोर आमदाराचं वक्तव्य

“शिवसेना म्हटलं की मोदी, शहा पण घाबरून रस्ता बदलतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More