बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत”

मुंबई | नियम तोडल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या जवळच्या व्यक्तीला देखील सोडत नाही, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. संजय राऊतांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना संजय राऊतांनी पोहरादेवी येथे संजय राठोड यांच्या समर्थनासाठी झालेल्या गर्दीबाबत भाष्य केलं.

पोहरादेवी येथे कोरोना प्रतिबंधासाठी घालून देण्यात आलेले निर्बंध झुगारुन गर्दी जमली होती. यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

उद्धव ठाकरे हे कायद्याची आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करतात. ते आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडणार नाहीत. त्यामुळे याप्रकरणात राज्य सरकारकडून कायद्याचं पालन केलं जाईल, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राज्यातील कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा येथे बैठकीत आढावा घेतला. तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशी देखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीवर भाष्य केलं.

या प्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

थोडक्यात बातम्या-

खासदार डेलकर मृत्यू प्रकरणातलं गूढ वाढलं; पोस्टमार्टम रिपोर्टमधून ‘ही’ माहिती आली समोर

…अन् त्याने जखमी हाेऊनही स्वत:च्या रक्ताने लिहून ठेवला पुरावा

प्रेरणादायी! लेकीसाठी बापाने चक्क शेतात क्रिकेटचं मैदान केलं उभं

संकटाचा सामना करायला सरकार तयार, पण…- उद्धव ठाकरे

कल्याणमध्ये तुफान राडा; काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याला शिवसेनेच्या महिला आघाडीनं दिला चोप, पाहा व्हिडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More