“उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा”
मुंबई | 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचा मुख्य चेहरा कोण असेल? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा आहेत, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
पंतप्रधान कोण असेल हे आपल्याला नंतर ठरवता येतं. पण आधी एकत्र येऊन निवडणुका लढवणं महत्त्वाचं आहे. सगळ्यांनी एकत्र येण्यावर उद्धव ठाकरेंचा भर आहे, असं राऊतांनी सांगितलंय.
याबाबत आता भाकीत करणं तेवढं सोपं नाही. राजकारणात काहीही घडू शकतं. उद्धव ठाकरे हा एक उत्तम चेहरा आहे. महाविकास आघाडीने ठरवलं होतं की, उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री होणार असतील तर आपण एकत्र येऊ आणि सरकार स्थापन करू, असं संजय राऊत म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.