Top News

तंगड्या तोडण्याची भाषा प्रतिष्ठितांना शोभत नाही- संजय राऊत

मुंबई | इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती यांना सुद्धा लोक प्रश्न विचारतात. या लोकशाहीमध्ये तुम्हाला टीका केलेली पटत नसेल तर तुम्ही उत्तर द्या. पण तंगड्या तोडण्याची भाषा प्रतिष्ठित व्यक्तीने करू नये. तुम्ही राजकारणात आहात, असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते उदयनराजे भोसले यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

तंगड्या तोडण्याची भाषा कोणीही केली असेल तर ती कोणत्याही लोकशाहीप्रधान देशामध्ये चालत नाही. तुम्ही कितीही मोठे असाल तरी सामान्य नागरिकालाही तुम्हाला उत्तर देण्याचा अधिकार या राज्यात आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर निशणा साधला आहे.

तुम्ही  राजकारणाच्या बाहेर असता तर प्रश्नच निर्माण झाला नसता. तुम्हाला त्या पक्षाच्या भूमिकेला घेऊन चालावं लागत असेल तर आमचाही पक्ष आहे आणि आमच्याही भूमिका आहेत एवढंच मी सांगू शकतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोण कोणत्या घराण्यात जन्मला आहे म्हणून त्याला महाराष्ट्रातल्या इतर सत्ता स्थानांविषयी बोलण्याचा अधिकार नाही. आम्ही तुमचा आदर राखतो तुम्ही आमचा आदर राखा, हीच महाराष्ट्राची परंपरा आहे, असंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या