मुंबई | एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी हिंदू-मुस्लिमांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला आहे.
वारीस पठाण यांच्यामागे 15 जण आले तरी मी सत्कार करेन, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. कोण वारीस पठाण? त्यांना विनाकारण महत्व दिलं जात आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
आम्ही 15 कोटी असलो तरी 100 कोटींना भारी आहे, असं चिथावणीखोर वक्तव्य ‘एमआयएम’चे माजी आमदार वारीस पठाण यांनी कर्नाटकातील गुलबर्गा इथल्या जाहीर सभेत केलं होतं. त्यावरुन देशभरात वाद उफाळला आहे.
दरम्यान, वारीस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप आणि मनसेनं वारीस पठाण यांच्यावर टीका केली आहे.
ट्रेंडिंग बातम्या –
ठाकरे सरकार-राज्यपालांमध्ये वादाची ठिणगी?; कारण ठरलेत ‘सरपंच’!
परीक्षेच्या काळात मशिदीवरील भोंगे बंद करा- युवासेना
महत्वाच्या बातम्या-
वाह रे मोदी तेरी चाल, ‘वंचित-एमआयएम’ तेरे दलाल- प्रणिती शिंदे
मी माफी मागणार नाही, संविधानात राहून बोललोय- वारीस पठाण
लहान भाऊ आज दिल्लीत घेणार मोठ्या भावाची भेट
Comments are closed.