बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आमचे राज्यात 22 खासदार होणार, 2024 मध्ये शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असेल”

मुंबई | आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्त बोलताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अनेक सूचक वक्तव्ये केली आहेत. शिवसेना राष्ट्रीय राजकारणात आहेच. दादरा आणि नगर हवेलमीमधून आमचा आणखी एक खासदार निवडून होईल. आमचा आकडा 22 वर जाईल, असं भाकित संजय राऊतांनी वर्तवलं आहे.

2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील एकूण 48 जागांपैकी 18 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला होता. आता संपूर्ण देशाला 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. या निवडणुकीत शिवसेना केंद्रस्थानी असेल, असं राऊत म्हणालेत.

शिवसेना पक्षप्रमुख पक्षाची दिशा ठरवतील. ठाकरे यांचे भाषण सकाळी 7.30 वाजता सुरु होईल. शिवसेना कोणती भूमिका घेणार हे पूर्ण देश समजून घेऊ इच्छत आहे. शिवसेना राष्ट्रीय राजकारणात आहेच. आता आमचे 22 खासदार होतील. 2025 नंतर शिवसेना देश पातळीवरील राजकारणात केंद्रस्थानी असेल, असं संजय राऊत म्हणाले.

देशात प्रखर राष्ट्रवादी सरकार आहे. तरीही देशात असं होत असेल तर ते चुकीचं आहे. सरसंघचालक मोहन भागवत कोणाला जबाबदार धरणार आहेत. नोटबंदी करताना मोदी यांनी देशाला वचन दिलं. पण तसं काही झालं नाही. याच मुद्द्यावरुन चार वर्षानंतर सरसंघचालक चिंता व्यक्त करत केलेली आहे, त्यांच्या बोलण्याला एक महत्त्व असतं, असं संजय राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“लायसन्स नसूनही उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी थेट व्होल्वो बस चालवायला दिली”

‘निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान’; संभाजी भिडेंची जीभ पुन्हा घसरली

“बेईमान धोरणाची पालखी वाहणारे सूर्याजी पिसाळ आजही महाराष्ट्रात निपजत आहेत”

“गोव्यात जिंकणारा पक्ष लोकसभेतही विजयी होतो, आम्ही दोन्ही ठिकाणी बाजी मारू”

‘गर्व से कहो हम हिंदू है’; शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी करत मनसेनं सेनेला डिवचलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More