महाराष्ट्र मुंबई

उद्धव ठाकरे हिंदूहृदयसम्राटांचे पुत्र, त्यांना हिंदुत्वाचे धडे गिरवण्याची गरज नाही- संजय राऊत

मुंबई | राज्यातील मंदिरं सुरु करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं. त्यात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करुन दिली. राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलंय. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. त्यांचा आत्मा आणि मन हिंदुत्वानं ओतप्रोत भरलेलं आहे. त्यामुळं त्यांना हिंदुत्वाचे धडे देण्याची गरज नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज्यपालांच्या पत्राला उत्तर दिलंय.

ठाकरे सरकार लोकनियुक्त आहे आणि राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळं सरकार घटनेनुसार चालत आहे की नाही तेवढंच पाहा, असा सल्लाही राऊतांनी राज्यपालांना दिलाय.

महत्वाच्या बातम्या-

अनिल परब यांना कोरोनाची लागण, मुख्यमंत्र्यांकडून आमदारांची बैठक रद्द

…अशावेळी तुम्हालाच हिंदुत्व शिकवण्याची गरज- चंद्रकांत पाटील

धोनीच्या मुलीला देण्यात आलेल्या बलात्काराच्या धमकीवर शाहिद आफ्रिदी म्हणाला…

…तर मी भाजपमध्ये प्रवेश करेन; कन्हैया कुमार यांचा व्हिडीओ व्हायरल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या