Top News महाराष्ट्र मुंबई

“आंदोलक शेतकरी देशद्रोही मग अर्णब गोस्वामी, आणि कंगणा राणावत देशप्रेमी आहेत का?”

मुंबई | आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही म्हटलं जातं मग भारतप्रेमी कोण आहेत?, असा सवाल करत शिवसेना संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यसभेत बोलताना राऊतांनी कृषी कायदे आणि अर्णब देसाई आणि कंगणा राणावत यांच्यावर भाष्य केलं.

अर्णब गोस्वामी, आणि कंगणा राणावत देशप्रेमी आहेत का?, त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या गोष्टी जाहीर केल्या आहेत, अशा गोष्टींना बळ देणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शेतकरी आंदोलन हे फक्त तीन राज्यांचं नाही तर सगळ्या देशातील शेतकऱ्यांचं आहे. पंजाबचे शेतकरी कोरोनाकाळात लंगर चालवतात आणि मुघलांविरोधात लढतात तेव्हा ते देशप्रेमी मग आंदोलन केलं तर ते देशद्रोही कसे झाले?, असं राऊत म्हणाले.

दरम्यान, लाल किल्ल्यावर तिरंग्याचा अपमान करणारा दिप सिद्धू कोण आहे, तो कोणाचा माणूस आहे. तो सिद्धू आतापर्यंत पकडला गेला नाही, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही उगाच कशाला नाव घेऊन त्यांना मोठं करायचं

‘सचिन तेंडुलकर भाजप सरकारचा दलाल’; संभाजी ब्रिगेड आक्रमक

नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

शेतकरी आंदोनावर सलमान खाननं सोडलं मौन; म्हणाला…

पाॅपस्टार रिहानाबद्दल भारतीय लोक इंटरनेटवर शोधत आहेत ‘ही’ धक्कादायक गोष्ट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या