Top News महाराष्ट्र मुंबई

“महाराष्ट्रातील सर्वच पुढाऱ्यांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचायला हवा”

मुंबई | औरंगाबादच्या नामंतरावरून सध्या महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये मतभेद असल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या नामंतराला विरोध करणाऱ्या काँग्रेसवर शिवसेनेने आपलं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रातील सर्वच पुढाऱ्यांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचयला हवा. निदान आपल्या बालपणातील इतिहासाची शालेय क्रमिक पुस्तके तरी नजरेखालून घालायला हवी. औरंगजेब हा सेक्युलर कधीच नव्हता, असं संजय राऊतांनी अग्रलेखामध्ये म्हटलं आहे.

औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचा भान पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं सेक्युलर नव्हे!असं म्हणत राऊतांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

दरम्यान, औरंगाबादचे नामांतर केल्यानं मुस्लिम समाज म्हणजे अल्पसंख्याक नाराज होतील व व्होट बँकेवर परिणाम होईल. म्हणजे स्वत:च्या सेक्युलर प्रतिमेवर प्रश्चचिन्ह निर्माण होईल, असंही राऊतांनी अग्रलेखात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“योगी आदित्यनाथ यांना माझ्यापेक्षा उत्तम मुख्यमंत्री मानतो

‘सर तुम्ही पेलाय’! गाडीला धडकी दिली म्हणून मांजरेकरांनी मारली चापट

“औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात एकपण शहर नको, ही शिवभक्ती म्हणा नाहीतर इतिहासाचा भान”

“मुस्लिम व्होट बँक दुरावेल या भीतीपोटीच काँग्रेसचा नामांतराला विरोध”

“केंद्रीय मंत्री किंवा सरकारमधील कोणत्या नेत्याने लस का टोचून घेतली नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या