Top News महाराष्ट्र मुंबई

“बाळासाहेब ठाकरे हे कायम हिंदूहृदयसम्राट राहिले आहेत आणि कायम राहतील”

मुंबई | शिवसेनेच्या उर्दू कॅलेंडरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उल्लेख ‘शिवाजी जयंती’ असा केल्याने भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

स्व. बाळासाहेब ठाकरे हे कायम हिंदूहृदयसम्राट राहिले आणि राहतील. लोकांच्या हृदयात त्यांचं स्थान हिंदूहृदयसम्राट असंच आहे. ते आजही हिंदूहृदयसम्राट म्हणून ओळखले जात असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

कोणताही राजकीय प्रक्ष असा प्रश्न उचलतो त्यावरून बाळासाहेब ठाकरे यांचं स्थान कमी होत नसल्याचं म्हणत राऊतांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असं म्हणत भातखळकरांनी त्या कॅलेंडरचा फोटो ट्विट केला होता.

थोडक्यात बातम्या-

सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका, हॉस्पिटलमध्ये दाखल

आकडा टाकणाऱ्यांनो सावधान! वीज चोरीची माहिती देणाऱ्यास…- ऊर्जामंत्री नितीन राऊत

कोरोनाची लस मोफत देण्याच्या घोषणेवरून केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची पलटी, आता म्हणतात…

अरे बापरे.. मला भीती वाटतेय, त्यांनी तात्काळ पत्रं लिहावं- संजय राऊत

कोरोना लसीसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या