बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘डोकी फुटली तर रडत दिल्लीत जाऊ नका’;संजय राऊतांचा कानडींना इशारा

मुंबई | बेळगावच्या मुद्यावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात अनेक वर्षापासून संघर्ष पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील आघाडीचा पक्ष शिवसेना या बाबतीत अनेक वेळा आक्रमक होऊन त्यांची भूमिका मांडताना दिसत आहे. काल बेळगावात शिवसेनेच्या एका जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यावरून वाद चिघळल्यानंतर दोन्ही राज्यातील बस सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

परिस्थिती हाताबाहेर गेली तर शिवसेना किंवा महाराष्ट्र त्याला जबाबदार राहणार नाही. मी स्वतः जाऊन, बेळगावातील दडपशाही विरोधात आवाज उठवणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. बेळगावात आमची डोकी फोडण्याचा कार्यक्रम सुरू असेल तर आमचेही हात बांधलेले नाहीत. आम्हीही जशास तसं उत्तर देऊ. आम्ही जर डोकी फोडली तर रडत रडत दिल्लीत जाऊ नका, असा इशाराही राऊतांनी कन्नड संघटनेला दिला आहे. बेळगावमधील तणाव वाढत असताना सर्व पक्षीय शिष्टमंडळ पाठवलं पाहिजे, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.

पश्चिम बंगालच्या हल्ल्यावर चिंता व्यक्त करणारे मोदी-शहा बेळगावच्या खूनी हल्ल्यावर गप्प का? असा प्रश्न देखील राऊतांनी यावेळी उपस्थित केला आहे. हा काही भारत-पाकिस्तान यांच्यातला वाद नाही. त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ या प्रश्नात लक्ष घालावं. हा भाषा वाद आहे. फार उकरून काढू नये. सांगली आणि सोलापूरचे लोक बेळगावात घुसले तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, असंही राऊत म्हणाले.

मी काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवेदने पाहिली आहेत. बेळगावला महाराष्ट्रात आणायचं ही त्यांची भूमिका आहे. पण सर्वात आधी तिकडच्या मराठी नागरिकांना संरक्षणाची गरज आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘पैसे नसतील तर शरीरसुख दे, त्यानंतर ऑर्डर काढतो’; अधिकाऱ्याची महिलेकडे धक्कादायक मागणी

नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित आणखी एक चित्रपट येतोय; ‘हा’ अभिनेता साकारणार मोदींची भूमिका

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठेला अखेर अटक!

कंगणा राणावतची आता थेट महात्मा गांधींवर टीका, म्हणाली…

रोड रोमियोला विद्यार्थिनीने भररस्त्यात धू-धू धुतलं, पाहा व्हिडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More