बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भाजपमध्ये सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का?’; अनिल देशमुख प्रकरणावरून राऊतांनी सुनावले खडेबोल

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर सीबीआयनंतर ईडीने छापेमारी केली. यानंतर ईडीने चौकशीसाठी समन्स बजावल आहे मात्र अनिल देशमुख उपस्थित राहिले नाहीत. यावरून विरोधी पक्षाने भाजपला घेरण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आहे. याच पार्श्नभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

अनिल देशमुख यांची एक बाजू आहे ती समजून घ्यायला हवी. भाजपच्या लोकांवर कधी अशा प्रकारचे आरोप झाले नाहीत का?, सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत का?, ते सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का?, बाकी सगळे हरामखोर आहेत का?, असे सवाल राऊतांनी भाजपला केले आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल देशमुखांची बाजू घेतली पाहिजे. त्यातले बरेच विषय मी सुद्ध समजून घेतले आहेत. प्रताप सरनाईक यांचीही बाजू समजून घेतली पाहिजे. त्यांच्यावर आरोप लावून ईडी किंवा केंद्रीय तपास यंत्रणा त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत?, अशा प्रकारचे अनेक आरोप भाजपवर करण्यात आले नाहीत का?, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यातील 11 कोटी जनतेनं विचार करण्याची वेळ आली आहे. लवकरच त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते एकत्र बसून पुढील पाऊलं टाकतील असं दिसत असल्याचंही राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

‘आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती’; थोरातांच्या लेकीचं पडळकरांच्या टीकेला सडेतोड उत्तर

‘तारक मेहता…’मधील पोपटलाल ‘या’ रोमॅण्टिक चायनीझ चित्रपटात झळकला होता! पाहा व्हिडीओ

राज्य सरकारने केली यंदाच्या गणेशोत्सवासाठीची नियमावली जाहीर, वाचा सविस्तर!

“मराठा समाज शरद पवारांच्या गाड्यांमागे धावला त्यांनी मराठा समाजाला काय दिलं?”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 मध्ये क्लीन बोल्ड होणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More