बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पंतप्रधानांच्या भेटीला विरोधी पक्षाला सोबत घ्यायला हवं होतं’; फडणवीसांना राऊतांचं प्रत्युत्तर

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर विरोधी पक्षाला सोबत नेलं असतं तर आनंद झाला असता असं विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीसांना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

विरोधी पक्षाने या भेटीचं स्वागत करायला हवं. आम्हाला या भेटीसाठी नेले असतं तर बरं झालं असतं, असं विरोधक म्हणत आहे. विरोधी पक्षाला नेण्याने जर राज्याला मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं, असं राऊत म्हणाले.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपला हा टोला लगावला. राज्याला मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री काल दिल्लीत गेले होते. या भेटीकडे सकारात्मकदृष्टीने पाहायला हवं. मेट्रो कारशेड अडकली आहे. त्याबाबतची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यावरही सकारात्मक चर्चा झाल्याचं राऊतांनी सांगितलं.

दरम्यान, केंद्रात त्यांच्याच पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे काही गोष्टी सरकारी असतात. त्या केंद्राकडे न्याव्या लागतात. केंद्राला राज्याच्या अडचणी सांगाव्या लागतात. विरोधी पक्षनेते जाणकार आहेत. याबाबत विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांना सल्ला आणि सूचना द्यायला हव्या, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“माझं भारतात पाऊल पडताच कोरोना संपणार”

शाब्बास रे पठ्ठ्या! सर्वाधिक गोलच्या स्पर्धेत भारताचा सुनिल छेत्री मेसीपेक्षा सरस

Beta आणि Delta व्हेरिएंटवर ‘ही’ लस अधिक प्रभावी; अभ्यासकांनी केला उलगडा

मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हता- किशोरी पेडणेकर

अनेक दिग्गज मंत्र्यासोबत काम करणारे विशेष अधिकारी राम खांडेकर यांचं निधन

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More