बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“केंद्र सरकार आमचा बाप असून केंद्रातील मंत्र्यांनी दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावं”

मुंबई | राज्यात मुसळधार पावसामुळे गेल्या आठवड्यात सातारा, सागंली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरड दुर्घटनेमध्ये अनेक नागरिकांनी आपला प्राण जीव गमावला आहे. त्यासोबतच अनेकांच्या घरात-दुकानात पाणी आल्याने प्रचंड नुकसान झालं. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी केंद्राकडे मदत मागितली आहे.

पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे. मात्र केंद्राची जबाबदारी असते म्हणून त्यांनी मदत केली पाहिजे. महाराष्ट्र राज्य केंद्राला सर्वाधिक कर देतं. विशेषता मुंबई पण आम्ही हिशोब मागायला बसलो नाही. केंद्र आमचा बाप आहे त्यांच्याकडून मदत झाली तर नक्की स्वीकारली जाईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात अनेक मंत्री आहेत त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सही असलेला दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावं. मोदींचा चेक मिळाला तर आम्ही वाजत गाजत स्वागत करू आणि कोकण, सातारा, कोल्हापूरमधील लोकांना मदत करू, असंही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र आपला आहे. कोकण आपला आहे. सातारा, सांगलीची लोकं आपली आहेत. ही काही श्रेयाची लढाई नाही. चढाई लढाई नाही. जर कोणाला तसं काही वाटत असेल तर माणुसकी शून्य काम करत असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’; अन् महापूरही भावाच्या लग्नाला रोखू शकला नाही!

“भाजप आमदाराला सोबत घेऊन राज्यपालांनी शासकीय दौरा करणं हे कितपत योग्य?”

पुरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी सरसावली पुढे; तब्बल 2.5 कोटींची मदत जाहीर

आर्थिक संकटांमुळे मोदी सरकार अतिरिक्त नोटा छापणार?; निर्मला सितारामन म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More