Top News महाराष्ट्र

बुलेट ट्रेन दिल्यामुळेच जपानच्या माजी पंतप्रधानांना पुरस्कार- संजय राऊत

मुंबई | प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सात जणांना पद्मविभूषण, 10 जणांना पद्मभूषण, तर 102 जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाले आहेत. यामध्ये जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्म विभूषण पुरस्कार मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्म पुरस्कार दिल्याबद्दल राऊतांना विचारण्यात आलं. त्यावर राऊत म्हणाले, बुलेट ट्रेन दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला असावा. महाराष्ट्राने जी बुलेट ट्रेन नाकारली, त्यासाठीच हा पुरस्कार असावा.

इतकं मोठं राज्य आहे. त्यात इतके लोक काम करतात. पण महाराष्ट्रातील केवळ सहा लोकांना पुरस्कार देण्यात आला आहे. इतर राज्यातील नावं पाहिली आहेत. राज्यातील 10 ते 12 लोकांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यता येतो. यंदा फक्त सहाच जणांना पुरस्कार देता?, संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ठाकरे सरकारने पद्म पुरस्कारांसाठी केंद्राकडे 98 मान्यवरांच्या नावांची शिफारस केली होती. यामध्ये संजय राऊतांचा समावेश होता.

थोडक्यात बातम्या-

अनाथांच्या मातेला ‘पद्मश्री’; सिंधुताईंच्या ‘या’ भाषणानं साऱ्यांच्याच डोळ्यात अश्रू

प्रजासत्ताकदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शहिदांना आदरांजली

“शौर्य आणि धैर्यासाठीचे मानाचे पदक पटकावून आपल्या बहाद्दरांनी महाराष्ट्राची प्रतिमा आणखी उंचावली”

ट्रॅक्टर परेडमधील शेतकऱ्याला स्टंटबाजी करणं पडलं महागात; पाहा व्हिडी

आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूर दौऱ्यावर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या