बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

होय, शिवसेना गुंडगिरी करते आम्ही सर्टिफाईड गुंड, सत्तेचा माज दाखवून राडा झाला असता तर…

मुंबई | अयोध्येतील राम मंदिरासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने जमीन खरेदी करताना घोटाळा झाल्याचा आरोप ‘आप’चे खासदार संजय सिंह आणि समाजवादी पक्षाचे नेते संजय सिंह केला आहे. यावर शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून टीका केली. याच पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेना भवनावर मोर्चा काढला. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद आणि बाचाबाची झाली. यामुळे शिवसेना गुंडगिरी करत असल्याची टीका होऊ लागली. यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

होय, आम्ही गुंड आहोत. ते सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्ही सर्टिफाईड आहोत. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड असल्याचं संजय राऊत म्हणाले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

सत्तेचा माज दाखवून राडा झाला असता, तर तो खूप वेगळ्या पद्धतीने झाला असता. आमच्या शिवसेना भवनाच्या दिशेनं कुणी चाल करत असेल तर होय आम्ही गुंड आहोत. ते सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नसल्याचं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, ही गुंडगिरी मराठी माणसाने केली म्हणून मुंबई महाराष्ट्रात राहिली. आम्ही ही गुंडगिरी केली म्हणून महाराष्ट्रात, मुंबईत मराठी माणसाचा आवाज आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“25 वर्ष सुरू असलेलं दानवाच्या राज्याचे रूपांतर रामराज्यात आपण करू”

सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण; पाहा आजचा दर?

कोणता निर्णय कधी घ्यायचा हे या सरकारला कळत नाही- गोपीचंद पडळकर

…तर महाराष्ट्रात चमत्कार होईल- संजय राऊत

मोठी बातमी! एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना एनआयएकडून अटक

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More