Top News महाराष्ट्र मुंबई

फडणवीसांना बैलगाडी अजून लक्षात आहे ही बाब कौतुकास्पद पण…- संजय राऊत

मुंबई | देवेंद्र फडणवीस यांना बैलगाडी अजून लक्षात आहे ही बाब कौतुकास्पद आहे पण नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्याजवळ असलेल्या बैलांचंही पोषण करण्याची ताकद उरलेली नसल्याचं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांची सध्याची जी स्थिती आहे ती खूप हालाकीची आहे आणि त्याला जबाबदार फक्त एकच राजकीय पक्ष असल्याचं म्हणत राऊतांनी भाजपला धारेवर धरलं.

देवेंद्र फडणवीसांनी केंद्राने केलेल्या कृषी कायद्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी  शेतकरी संवाद यात्रेत सहभाग झाले होते. त्यानंतर फडणवीसांनी कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे कसे यावर भाषण केलं. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, राज्यात शेतकरी संकटात असताना राज्य सरकारने कोणतीही मदत केली नाही. शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. परंतू प्रत्यक्षात सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘हे’ 2 खेळाडू कसोटीत करणार पदार्पण

देवेंद्र फडणवीसांचा 23 वर्षापुर्वीचा ‘तो’ रेकॉर्ड अखेर ही तरूणी तोडणार

‘तोंड फोडून घ्यायची आवड असलेले महा निर्लज्ज आघाडी सरकार’; भातखळकरांची जहरी टीका

मनसेचं खळखट्याक! पुण्यानंतर मुंबईतील अॅमेझॉनची कार्यालयं फोडली

ग्रामपंचायत सदस्यासाठी आता शिक्षणाची अट; नव्या जीआरनं अनेकांना मोठा झटका!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या