बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वाघ हा वाघ असतो मग तो पिंजऱ्यातला असो की जंगलातला, महाराष्ट्रावर वाघाचं राज्य”

जळगाव | शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत विरोधी पक्ष भाजपवर निशाणा साधत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राज्यात संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. अशातच पुन्हा एकदा राऊतांनी चंद्रकांत पाटलांना टोला हाणला आहे.

नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हते तेव्हापासून भाजपची वाघाशी मैत्री होती. मैत्री कोणाशी करायचे हे वाघ ठरवतो. वाघ हा वाघ असतो.मग तो पिंजऱ्यातला असो किंवा जंगलातला. महाराष्ट्रावर वाघाचे राज्य आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राज्यात सत्ता असली तरी संघटनेला बळ देणं, गावातला शिवसैनिक काय करत आहे. हे प्रत्यक्ष जाऊन पाहणं हे आमच्यासारख्या नेत्यांचे कर्तव्य आहे म्हणून मी उद्धव ठाकरेंच्या सूचनेनुसार हा दौरा करत आहे. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात संघटनेचं काम उत्तम प्रकारे सुरू असल्याचं संजय राऊत म्हणाले. यावेळी राऊतांनी काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावरही आपली प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जर स्वबळावर निवडणुका लढत असतील तर त्यांचे स्वागत आहे. स्वबळावर लढून जर ते केंद्रात सत्ता आणणार असतील, मोदींना आव्हान उभे करत असतील तर त्यांचे स्वागत आहे. काँग्रेसचा पंतप्रधान व्हायला हवा, आमचा त्यांचा पाठींबा असेल, असंही संजय राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

अखेर कोरोना लसीचा पहिला डोस घेतला- अमृता फडणवीस

लसींचा अपव्यय टाळण्यासाठी केंद्रानं सुचवला हा खास उपाय

व्हॉट्सअॅप मेसेज पुर्णपणे सुरक्षित तरी कसे होतात प्रायव्हेट चॅट, फोटो लीक; वाचा सविस्तर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींंचा भाऊ सांगत बाप-लेक करायचे ‘हे’ धक्कादायक कृत्य

विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीची महिला पोलीस हवालदारानं काढली आरती, पाहा व्हिडीओ

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More