बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्ही तलवार, बंदुका घेऊन लढणारे, आज मराठा रस्त्यावर आंदोलन करतोय हे देशाचं दुर्देव”

नवी दिल्ली | राज्यसभेत 102 घटना दुरूस्ती विधेयकावर चर्चा सुरू आहे. या चर्चेवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बोलताना भाजपवर टीका केली आहे. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. आम्ही तलवार, बंदुका घेऊन लढणारे लढवय्ये आहोत. तागडी आणि तराजू आमच्या हातात आलं नसल्याचं संजय राऊत म्हणाले.

तुम्ही आणलेलं बिल हे अर्धवट असून 50 टक्क्यांची मर्यादा जोपर्यंत वाढवली जात नाही तोपर्यंत फायदा नाही. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा 30 वर्षांपासून आहे. त्यामुळे त्याचा काही फायदा होणार नाही. तुम्ही आता काही बदल कराल किंवा दुरूस्ती कराल त्याने काही फायदा होणार नाही तुम्हाला मर्यादा वाढवावीच लागेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

सर्वात आधी शाहू महाराजांनी पहिलं आरक्षण दिलं होतं. त्यांनी 119 वर्षांपुर्वी 50 टक्के आरक्षण दिलं होतं. आरक्षण देणारा पहिला राजा मराठा आणि महाराष्ट्रातील होता. आज मराठा समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे हे देशाचं दुर्देव असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सभागृहात बसलेले मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील प्रमुख नेते छत्रपती संभाजी महाराज आहेत. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवर यावी त्यांचीही हीच भावना आहे. त्यामुळे सरकारने सर्वांच्या भावनांचा विचार करून निर्णय घ्यायला हवा, असंही राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘तुमची इयत्ता कंची ?’; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल

सीमाभागातील गावे तात्काळ महाराष्ट्रात सामील करण्यात यावीत; अजित पवारांचं पंतप्रधानांना पत्र

ऑक्सिजनअभावी झालेल्या मृत्युबाबत दिलेल्या स्पष्टीकरणावरून संसदेत केंद्राचा ‘यु-टर्न’

व्यंकय्या नायडूंना सभागृहात अश्रू अनावर, भावूक होत म्हणाले…

ठाकरे सरकारने भलतंच करून दाखवलं, प्रविण दरेकरांची सरकारवर जोरदार टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More