बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्हाला मुख्यमंत्रिपद मिळालं, तुम्हीही एकत्र येऊन पुणे महापालिकेवर महाविकास आघाडी आणायला हवी”

पुणे | राज्यात महाविकास आघाडी आहे. मग महापालिकेवरही महाविकास आघाडी आणायला हवी, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यानी म्हटलं आहे. म्हाळुंगे ग्रामपंचायत इमारतीचं उद्घाटन संजय राऊतांच्या हस्ते करण्या आलं. त्यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पुणे महापालिकेवर सत्ता आणण्याचा आदेशच दिला.

महाराष्ट्रात वेगळा प्रयोग केला आणि तो आदर्श ठरला आहे. राज्यातील प्रत्येक महापालिका, ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी झाली पाहिजे. आम्हाला मुख्यमंत्रिपद मिळालं आहे. आम्हाला आता काही नको, तुम्हीही एकत्र येऊन मार्ग काढा, असा सल्लाही संजय राऊतांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

मी पुन्हा येईल. मी दिल्लीत असलो तरी माती महाराष्ट्राची आहे. मी पुन्हा येईन, गावात पुन्हा येईन, प्रचारासाठी पुन्हा येईल, असं राऊत म्हणाले. राऊतांच्या पुन्हा येईलच्या वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी बोलताना संजय राऊतांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना टोला हाणला.

दरम्यान,महापौर अजून आले नाहीत, त्यांची वाट पाहतोय. महापौरांनी सगळीकडे जायला हवं. महापौरांना वाटतं की राज्य आपल्या हातात आलं आहे. ते त्यांना सोडायचं नाही, असं मिश्किलपणे राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

सर्वोच्च स्तरापेक्षा सोनं तब्बल 8211 रुपयांनी घसरलं; वाचा ताजे दर

ईशा देओल ‘या’ वेबसीरीजमधून करणार डिजीटल क्षेत्रात पदार्पण!

मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत झाली लक्षणीय घट

‘मी काय ईडीचा प्रवक्ता नाही’; खडसेंच्या ईडी चौकशीवर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More