Top News महाराष्ट्र मुंबई

चीन आणि पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक करा- संजय राऊत

मुंबई | उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्राकडे सर्जिकल स्ट्राइक करण्याची मागणी केली आहे.

एखादा केंद्रीय मंत्री अशी माहिती देत असेल तर तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी चीन आणि पाकिस्तानावर लगेच सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.

जर आपल्या देशात बाहेरची शक्ती, अस्थिरता, अशांतता निर्माण करत असतील तर राष्ट्रभक्त असल्याच्या नात्याने शिवसेना हे वक्तव्य फार गांभीर्याने घेत आहे. संरक्षणमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख यांनी गांभीर्याने विचार करून सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

दरम्यान, संजय राऊतांच्या या मागणीवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांवरच्या खटल्याला कोर्टाकडून ‘तारीख पे तारीख’; या तारखेला होणार सुनावणी

‘बायकोने बजावलंय मेव्हणाच्या लग्नाला आला नाहीत तर…’; सुट्टीसाठी पोलिसाने केला अनोखा अर्ज

‘…तर उद्या विधानसभा बरखास्त करून राज्यात निवडणुका घ्या’; भाजपचं राष्ट्रवादीला आव्हान

…म्हणून रानगव्याचा मृत्यू झाला; वनविभागातील अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

….म्हणून अमेरिकेत लोकांना कोरोना झाला हे बरं झालं- डोनाल्ड ट्रम्प

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या