बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सचिन वाझे उत्तम तपास अधिकारी, विरोधकांनी राजीनामा अन् बदल्यांमध्ये रमू नये”

मुंबई | सध्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने त्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. मनसुख यांनी आत्महत्या नाही तर त्यांची हत्या झाल्याचा संशय त्यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी केला आहे. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलं असून वाझेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर शिवसेनेते खासदार संजय राऊत यांनी यावर आपली प्रतिक्रिया देताना विरोधकांना टोला हाणला आहे.

सचिन वाझे हे निष्णात पोलीस अधिकारी आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी दोन प्रमुख प्रकरणांना हात घातला. अन्वय नाईक हे दडपलेलं प्रकरण वाझेंनी उघडकीस आणलं होतं. संबंधित व्हाईट कॉलर आरोपींना अटक केली त्यामुळे त्यांना लक्ष्य केलं जात असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

स्कॉर्पिओ गाडीचं प्रकरण इतकं मोठं नाही. अंबानींच्या जीवाप्रमाणे सामान्य आणि आणि आंदोलक शेतकऱ्यांच्या जीवाची किंमत आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने फक्त राजीनामा आणि बदल्यांमध्ये रमू नये, असं म्हणत राऊतांनी विरोधकांवर निशाणा साधला.

दरम्यान,  सचिन वाझेंनी अन्वय नाईक कुटुंबियांनादेखील न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं होतं. त्यासोबतच टीआरपी घोटाळाही उघडकीस आणला होता. याबाबत विरोधी पक्ष बोलत नाही मात्र त्यांना या मुद्यावरून टार्गेट केलं जात आहे. दोन आरोपींना त्यांनी तुरूंगात टाकलं हाही मुद्दा त्यामागे असू शकतो, असं राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“सत्ता गेल्यानं अनेकांना सहन होत नाही अन् सांगताही येत नाही”

राखी सावंतचा नागीन अंदाज पाहिलात; पाहा व्हिडीओ

भाजपने चार वर्षापुर्वी तिकीट कापलेले तीरथ सिंह उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री!

…म्हणून शिवराज सिंह चौहानांना ‘पावरी हो रही है’ चा मोह आवरला नाही

‘नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपयांची मदत करणार पण…’; अजित पवारांची मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More