बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सचिन वाझेंना अटक करुन महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला- संजय राऊत

मुंबई |  मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते एटीएस आणि एनआयएच्या रडारवर होते. तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या अग्रलेखातून सचिन वाझेंच्या अटकेवरून केंद्रावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राच्या पोलीस दलाची क्षमता आणि शौर्य याची वाहवा जगभरात असताना 20 जिलेटिनच्या कांड्यांसाठी केंद्रीय तपास पथकाने मुंबईत यावं हे आश्चर्यच आहे. सचिन वाझे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास मुंबई पोलीस, दहशतवादविरोधी पथक सक्षम होतेच पण केंद्रीय तपास पथकाला ते होऊ द्यायचे नव्हतं. त्यांनी वाझे यांना अटक करून महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हे सर्व ठरवून घडवले जात आहे. वाझे यांना अटक करून दाखवली, याचा आनंद जे व्यक्त करीत आहेत ते राज्याच्या स्वायत्ततेवर घाला घालत आहेत. सत्य लवकरच बाहेर येईल ही अपेक्षा, अशी टीका शिवसेनेनं केली आहे. याआधी देवेंद्र फडणवीसांनी वाझेंना अटक झाल्यावर सूचक वक्तव्य केलं होतं.

दरम्यान, आता तर नुसती सुरूवात झाली आहे, एकच भाग बाहेर आला आहे, दुसरा भाग अत्यंत महत्वाचा आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी पोलीस खात्यातील लोक सामील असतील तर कायदा आणि सुव्यवस्था कशी राहणार असा सवाल करत राज्य सरकारवर टीका केली होती.

थोडक्यात बातम्या- 

‘हा’ आयपीओ बाजारात बुधवारी धडकणार; गुंणतवणुकदांरांंना मोठी संधी

‘माझा अभ्यास दांडगा, मला वनमंत्री करा’; संजय राठोडांच्या मतदारसंघातील शिवसेना नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

“लाॅकडाऊन पुन्हा सुरू होणं हे राज्यासह सर्वसामान्य लोकांना परवडणार नाही”

इशान किशनचं धूमधडाक्यात पदार्पण, भारताचा इंग्लंडवर दमदार विजय

जखमी वाघिण जास्त घातक असते- ममता बॅनर्जी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More