बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘जिद्द म्हणजेच शरद पवार, दुसरं काही नाही’; राऊतांनी घेतली पवारांची भेट

मुंबई | पित्ताशयाचा त्रास होत असल्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरद पवार नुकतेच घरी आले आहेत. यादरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी सिल्वर ओक बंगल्यावर जाऊन शरद पवारांची सदिच्छा भेट घेतली.

जिद्द म्हणजेच शरद पवार, दुसरे काही नाही’ असं म्हणत संजय राऊतांनी पवाराचं कौतुक केलं. शरद पवारांची प्रकृती उत्तम असून त्यांनी विविध विषयांवर दिलखुलास चर्चा केली असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार उत्तम काम करत आहे, असंही शरद पवार यांनी सांंगितल्याचं संजय राऊत म्हणाले. याबाबत राऊत यांनी ट्विट केलं आहे. रुग्णालयातून घरी आल्यानंतर शरद पवारांनी शुक्रवारी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत गाडीतून मुंबईत फेरफटका मारला. यावेळी सुप्रिया सुळेंनी फेसबुक लाईव्ह केलं होतं. शरद पवार मुंबईत कधी आले, कुठे राहिले, शरद पवारांनी पूर्वीची जुनी मुंबई कशी होती हे सर्व या फेसबुक लाईव्ह दरम्यान सांगितलं.

दरम्यान, मी 1962-63 मध्ये काँग्रेसचे युवक सेक्रेटरी म्हणून आलो त्यावेळी दादरला खेड गल्ली होती. तिथे सगळे मिल वर्कर होते. पुणे जिल्ह्यातील लोक जास्त होते. आता त्याचं नाव काकासाहेब गाडगीळ लेन असं आहे. आता तिथे काँग्रेसचं टिळक भवन आहे. तिथे आम्ही राहायचो. आम्ही तिथे 5 वर्ष टिळक भवनमध्ये राहिलो मी काँग्रेस नेते असे बरेच होतो. आता बदललंय सगळं, असं शरद पवार म्हणाले होते.

 

थोडक्यात बातम्या- 

कोरोना आकड्यांची बनवाबनवी तत्काळ थांबवा- देवेंद्र फडणवीस

‘माझ्या सूनेचे क्रिकेटर इरफान पठाणसोबत अनैतिक संबंध’; निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे गंभीर आरोप

कोरोनाबाधित रुग्णाला एका दिवसात बरं केल्याचा दावा, डॅाक्टरवर गुन्हा दाखल

‘हिन्दुस्तानी भाऊ’ला पोलिसांनी घेतलं ताब्यात, जाणून घ्या कारण; पाहा व्हिडीओ

जनतेवर ‘माझा जीव माझीच जबाबदारी’ म्हणण्याची वेळ आली- राधाकृष्ण विखे पाटील

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More