बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवारांना भेटलो, ते म्हणाले उद्धव ठाकरे 5 वर्षाचा कालावधी पूर्ण करतील”

मुंबई | सध्या राज्यात तिन्ही पक्षांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून मतभेद होत असताना आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांतील नेत्यांच्या वक्तव्यांमुळे अनेक चर्चांणा उधाण येत आहे. यावरून विरोधी पक्ष भाजप सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली. यानंतर राऊतांनी दोघांमध्ये झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली.

शरद पवार यांना भेटलो. दिल्ली महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारच्या स्थिरते संदर्भात त्यांच्या मनात शंका दिसत नाही. उद्धव ठाकरे पाच वर्षाचा कालावधी पुर्ण करतील. ते मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय आहेत असं पवार म्हणाले, अशी माहिती संजय राऊतांनी दिली. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

सत्ता गेल्याने ज्यांच्या पोटात दुखत आहे त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी सरकार पाच वर्षे चालणार. महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी यश मिळणार नाही, असं राऊत यांनी म्हटलं होतं.

दरम्यान,  ठाकरे सरकारमधील काँग्रेस पक्षाने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवतील, असं शिवसेनेकडून बोललं जात होतं.

 

थोडक्यात बातम्या- 

कौतुकास्पद! भर पावसात जेसीबी चालकाची माणुसकी, पाहा व्हिडीओ

वर्ल्ड रेकॉर्डसाठीच मोदी सरकारची साठेबाजी?- पी. चिदंबरम

राष्ट्रवादीतील प्रस्थापितांना दे धक्का, जयंत पाटलांच्या आणखी एका नातेवाईकाला मोठं पद!

“कोरोनाचे नियम पाळूच पण मूर्ती मात्र उंचच आणू”

“ठाकरे सरकार कायद्याने चालत नाही हे राष्ट्रपतींना कळवा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More