Top News महाराष्ट्र मुंबई

“उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार, भविष्यातील राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू शिवसेना”

मुंबई | भविष्यात ज्या घडामोडी घडतील त्या भूकंपाचं केंद्रबिंदू शिवेसेनाभवन असेल आणि उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार, असा दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्राचं नेतृत्व तीन पक्षाच्या नेत्यांनी करायचं ठरवलं आहे. आमचा एकही आमदार फुटणार नाही असं विरोधक म्हणत आहे. पण थोडे दिवस थांबा, काय काय होतंय दिसंल, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. यावरून ठाकरेंवर विरोधकांनी निशाणा साधला. या टीकाकारांवरही राऊतांनी टीकेचे बाण सोडले

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना लोकांचा जीव वाचवायचा आहे. संचारबंदी लावण्याचा मुख्यमंत्र्यांना आनंद होत नाही, तुमचा जीव वाचावा म्हणून त्यांनी संचारबंदी लागू केली आहे, असं राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

मला केंद्रात मंत्रिपद मिळालं तरी…- सुजय विखे-पाटील

कोहलीच्या अनुपस्थितीत ‘या’ खेळाडूने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी- गौतम गंभीर

“इंग्लंडमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना विषाणूचा जास्त बाऊ करु नका, त्याऐवजी…”

नाईट कर्फ्यूच्या निर्णयावर हॉटेल व्यावसायिक नाराज; शरद पवारांची घेणार भेट

शिवसेनेचा स्वबळाचा नारा; ‘या’ निवडणुका स्वबळावर लढवणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या