बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथांना चपलेने मारण्याची भाषा केली- संजय राऊत

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकनाट्यानंतर राणेंना जामीन मिळाला आणि त्यांची सुटका झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राणेंनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर टीका केली. त्यासोबतच काही प्रश्नही शिवसेनेला केले होते. यामधील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चप्पल मारण्याचं केलेलं वक्तव्य सुसंस्कृतपणा होता का?, असा सवाल केला होता. यावर शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आम्हाला छत्रपती शिवरायांबद्दल आदर आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना चप्पल घालुन हार घालत नाही. ही आमची संस्कृती आणि परंपरा आहे. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नितांत आदर आहे. योगी आदित्यनाथ यांनी शिवरायांच्या प्रतिमेला चप्पल घालुन हार घातला होता. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी योगी यांच्याबद्दल असं वक्तव्य केल होतं, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं आहे.

तुम्ही तुमच्या खात्याच काम करा, जास्त शहाणपणा करू नका. तुमच्या खात्याच काम करण्यासाठी तुम्हाला केंद्रीय मंत्री केलं आहे. तुम्ही अंगावर येण्याची भाषा करत असालं तर ही शिवसेना आहे. हे आधी लक्षात घ्या, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर नारायण राणे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना, नारायण राणेंना नाव न घेता अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.काही-काही जुने व्हायरसही पुन्हा परत आले असून कारण नसताना साईट इफेक्ट्स त्याच्यात आणत आहेत मात्र त्या नव्या-जुन्या व्हायरसला नष्ट करायचं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“शिवसेनेचे मर्द नाही बंद कार्यालयावर हल्ला म्हणजे गांडूपणा”

तुम्ही स्वत:ची काळजी घ्या, कारण सरकार देश विकण्यात व्यस्त आहेत- राहुल गांधी

“मी जर गॅंगस्टर होतो तर शिवसेनेने मला मुख्यमंत्री का केलं होतं”

‘काही जुने व्हायरस परत आलेत, त्यांचा…’; मुख्यमंत्र्यांची नाव न घेता राणेंवर टीका

काय सांगता! पुणे मेट्रोतून चक्क सायकल घेऊन प्रवास करण्याची मुभा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More