बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर अशा वादळांची सरकारला आता सवय झालीये”

मुंबई | मुख्यमंत्र्यांनी राजधर्माचं पालन केल्याने विरोधकांच्या तथाकथित वादळातील हवाच गेली. राज्यपाल, विरोधी पक्ष राजधर्म कधी पाळणार?, असा सवाल शिवसेनेनं सामनाच्या अग्रेलाखातून राज्यपालांना केला आहे.

राज्यपालांनी ठाकरे सरकारशी जो उभा दावा मांडला आहे, 12 आमदारांच्या नियुक्त्या ज्या पद्धतीने लटकवून ठेवल्या आहेत, हे घटनेच्या विरुद्ध आहे. राजधर्माचे पालन न करण्याचे हे काम आहे, असं म्हणत शिवसेनेनं अग्रलेखातून राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी वगैरे ठरणार असल्याचं बोललं जात आहे. आता हे वादळ होणार म्हणजे नक्की काय होणार? नुसता गडगडाट होणार की मुसळधार असं काही घडणार?, असा टोला शिवसेनेनं भाजपला लगावला.

सध्याच्या काळात विधिमंडळात वादळ याचा अर्थ विरोधक सभागृहात गोंधळ घालणार, विधानसभा अध्यक्षांच्या समोर येऊन घोषणाबाजी करणार, सरकारविरोधात आरोळय़ा ठोकणार, असा होतो. हेच वादळ असेल तर अशा वादळांची सरकारला आता सवय झाली आहे, असंही अग्रलेखात म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

…अन् ‘या’ पत्रकाराने शेतकरी आंदोलनातच 12 लाखाच्या नोकरीचा दिला राजीनामा!

“आमचा कोणावरही आरोप नाही, संजय राठोड यांचा बळी घेऊ नका”

‘हिंमत असेल तर…’; अजित पवारांचं देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज

‘बिग बी’ यांच्या प्रकृतीत बिघाड स्वत: पोस्ट करत दिली माहिती

सावधान! पुणे जिल्ह्यात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय; पाहा सविस्तर आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More