Sanjay Raut | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. उद्धव ठाकरे हे मविआकडे मुख्यमंत्रीपदाची याचना करत असल्याचा टोला त्यांनी लगावला होता.त्यांच्या या टीकेचा आता ठाकरे गटाच्या खासदाराने चांगलाच समाचार घेतला आहे.(Sanjay Raut )
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज (23 ऑगस्ट) माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. बावनकुळे ही एक राजकारणातली वाया गेलेली केस आहे, अशा शब्दांत राऊत यांनी टीका केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर राऊतांची टीका
“बावनकुळे यांच्या कामटी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष 30 हजारांनी मागे आहे. त्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झालेला असू शकतो. आम्ही महाविकास आघाडीची भूमिका मांडली आहे. आम्हाला कुणाची याचना करायची गरज नाही. त्यामुळे बावनकुळे यांनी चौपाटीवर कान साफ करून घ्यावे.”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
यावेळी राऊत यांनी राज्याच्या पोलिस खात्याबाबत देखील मोठं विधान केलं. त्यांनी पोलिस खात्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. “राज्याच्या पोलीस महासंचालक महिला असून त्या जाहीरपणे सांगतात, मी संघाची कार्यकर्ती आहे, तर तुम्ही काय अपेक्षा करणार? पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुका कुटुंबाची पार्श्वभूमी संघ परिवाराशी संबंधित आहे का? हे पाहून केल्या जातात. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचं हे क्वालिफिकेशन असेल, तर पोलीस दलात निराशा पसरणार”, असा आरोप राऊत (Sanjay Raut ) यांनी केला आहे.
संजय राऊतांचा पोलिस खात्यावर गंभीर आरोप
“राज्यातलं पोलीस खातं भ्रष्टाचाराने बरबटलं आहे. पैसे दिल्याशिवाय बढती, बदल्या होत नाहीत. बढती, बदल्या का थांबल्या आहेत? याचं कारण म्हणजे टेंडरला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. हे असं असल्यामुळे बदलापूर, कोल्हापुर, अंबरनाथ, अमळनेर सारख्या घटना घडणार”, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला.
पुढे ते म्हणाले की, “गुन्ह्याच्या प्रक्रियेसाठी पोलीसही जबाबदार आहेत. ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर येथील पोलीस हे पोलीस नसून मिंधे गँगचे सदस्य आहेत. आयुक्तांपासून सगळ्यांनीच कायद्याच्या रक्षणाची शपथ घेतलेली असते. इथले पोलीस खाकी वर्दीतले निर्जीव लोक आहेत.”, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केली आहे.
News Title : Sanjay Raut target Chandrashekhar Bawankule
महत्त्वाच्या बातम्या-
गुडन्यूज! PM आवाज योजनेत आता ‘या’ लोकांनाही मिळेल हक्काचे घर
आनंदवार्ता! सोनं तब्बल ‘इतक्या’ हजारांनी घसरलं, काय आहेत सध्या भाव?
नीरज चोप्राने मोडला ऑलिम्पिकचा रेकॉर्ड; पाहा डायमंड लीगमधील बेस्ट थ्रो VIDEO
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन्ही जागा महायुतीकडे; ‘या’ दोन नेत्यांची बिनविरोध निवड!
आज ‘या’ राशींच्या व्यक्तींना आर्थिक तोटा होईल, ताणतणाव वाढेल!