Sanjay Raut | शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (30 जुलै) माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे वेगवेगळ्या विमानतळावरून जेव्हा-जेव्हा दिल्लीला जायचे ते मौलवीच्या वेशात जायचे आणि अमित शाह यांना भेटायचे, असा दावा संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केला आहे.
या दाव्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. “मुख्यमंत्री शिंदे नाव बदलून मौलवीच्या वेशात दिल्लीला जायचे. त्यांना दाढी तर आहेच. त्यांना मौलवीचा वेश शोभतो”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. यावेळी त्यांनी ‘धर्मवीर’चित्रपटाबद्दल देखील भाष्य केलं.
“नाव बदलून एकनाथ शिंदे दिल्लीला जायचे”
शिंदे यांनी धर्मवीर चित्रपटाची निर्मिती केली आहे. ते स्वत:ला आनंद दिघे यांचे शिष्य म्हणवत असले तरी ते दिल्लीला अनेकदा मौलवीच्या वेषात गेलेले आहेत. ते नाव बदलून दिल्लीत अमित शाह यांना भेटले. अजित पवार देखील वेशांतर करून दिल्लीत येतात, अशी माहिती माझ्याकडे आली असल्याचं राऊत (Sanjay Raut ) म्हणाले आहेत.
या दोघांना दोन्ही विमानतळावर कोणी रोखत नाही. याचा अर्थ त्यांनी बनावट ओळखपत्र बनवले आहेत. पॅनकार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड आदी त्यांनी बनावट कागदपत्रे बनवली आहेत, असा आरोप देखील राऊत यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी बनावट ओळखपत्रं तयारी केली
तसेच पुढे ते म्हणाले की, या सगळ्या गोष्टींची दखल घेतली पाहिजे. त्यांनी प्रवासात बोर्डिंग कार्ड्स, ओळखपत्रे वापरली ती जप्त करून अजित पवार तसेच इतर काही लोकांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांची चौकशी करायला हवी, अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली आहे.
इतकंच नाही तर, काश्मीरमध्ये अतिरेकी का घुसत आहेत, याची तालीम एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दाखवून दिली आहे, अशी टीका देखील संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केली आहे.
News Title – Sanjay Raut Target cm Eknath Shinde
महत्त्वाच्या बातम्या-
अश्लीलतेचा कळस! दिल्ली मेट्रोत तरुणीने केली चक्क प्रग्नेन्सी टेस्ट, Video व्हायरल
“पुणे बरबाद व्हायला..”; राज ठाकरेंचा राज्य सरकारवर संताप
मोठी बातमी! कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तातडीने पार पडली शस्त्रक्रिया; नेमकं झालं काय?
“त्याने पँटची चैन उघडली अन् माझा हात…”, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
“लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका”