“शिंदेंमध्ये दिल्लीसोबत पंगा घ्यायची हिंमत नाही, त्यामुळे…”; संजय राऊतांनी डिवचलं

Sanjay Raut | मुंबईतील आझाद मैदानावर आज (5 डिसेंबर) महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. आज महायुतीचा शपथविधी सोहळा अत्यंत भव्य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची या सोहळ्याला उपस्थिती राहणार आहे.या शपथविधी सोहळ्याआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

“एकनाथ शिंदे हे शंभर टक्के शपथ घेतील. कारण, त्यांच्यात दिल्लीसोबत पंगा घेण्याची आता हिंमत नाही. अडीच तीन वर्षांपूर्वी त्यांच्यात हिंमत नव्हती म्हणून त्यांनी पक्ष सोडला. आज तीन लोकांनी शपथ घेतल्यावर उरलेल्या मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी बराच वेळ मिळतो. बघूयात आता महाराष्ट्राच्या भाग्यात काय लिहिलं आहे ते..”, असं संजय राऊत म्हणाले. आज ते माध्यमांशी संवाद साधत होते.

फडणवीस यांना राऊतांकडून शुभेच्छा

राज्यात नवीन मुख्यमंत्र्यांचं नवीन पर्व सुरू होईल, त्यानंतर राज्यात पाच वर्षे धुमशान पाहायला मिळणार असून यात महाराष्ट्राचं हित किती आणि अहित किती हे येणारा काळ दाखवेल, असंही राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. अजितदादांचं राजकारण वेगळं आहे. त्यांनी दिल्लीसोबत चांगलं जुळवून घेतलंय अशी माझी पक्की माहिती आहे, असा टोला राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला.

यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देखील दिल्या. अखेर आज आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी विराजमान होत आहेत. महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे त्यांना आमच्या शुभेच्छा. जोपर्यंत ते या पदावर आहेत तोपर्यंत हे महान महाराष्ट्र राज्य सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे, असं राऊत म्हणाले.

आज सायंकाळी पार पडणार शपथविधी सोहळा

दरम्यान, आज सायंकाळी महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, संत-महंत यांची उपस्थिती असणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.

शपथविधी दरम्यान 10 पोलीस उपायुक्त, 20 सहाय्यक पोलीस आयुक्त, 100 पोलीस निरीक्षक, 150 सहाय्यक व पोलीस उपनिरीक्षकांसह 1500 हून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर सशस्र पोलीस दल, टास्क फोर्ससह इतर सुरक्षा यंत्रणाही सज्ज असणार आहेत. (Sanjay Raut)

News Title –  Sanjay Raut target eknath shinde 

महत्त्वाच्या बातम्या : 

अखेर फडणविसांच्या मनधरणीला यश, एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ!

शपथविधीपूर्वीच सोनं झालं स्वस्त, ‘इतक्या’ रुपयांनी घसरले भाव

मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा कुठे व किती वाजता? जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर

सर्वात मोठी बातमी! शिंदे गटातील ‘या’ नेत्यांची मंत्रीपदी वर्णी?

‘मी अमित शाहांना…’; अजित पवारांनी केला मोठा खुलासा