Sanjay Raut | महाराष्ट्रात महायुती सरकारने आणलेल्या ‘लाडकी बहीण’ योजने’चा विधानसभेत चांगलाच बोलबाला दिसून आला. निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली. महायुतीला जनतेने विजयी कौल दिला. आता महाराष्ट्रातील महिला या डिसेंबरच्या हप्त्याची वाट बघत आहेत. कालपासून डिसेंबरच्या पैशांचे वितरण करण्यात येत आहे. काल 24 डिसेंबरपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या योजनेवरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारला धारेवर धरलंय.
लाडकी बहिण योजनामुळे सरकारी तिजोरी मोकळी झाली असून महसूल तूट भरून काढण्यासाठी दारूच्या दुकानांचे परवाने वाढवण्यावर अर्थमंत्री अजित पवार यांच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. यावर बोलतानाच संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
“1500 रुपयांसाठी महाराष्ट्र दारुडा करणार”
“लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यासाठी लाडक्या बहिणीचे भाऊ आणि नवऱ्यांना ते दारूडे करणार आहेत. प्या दारू. 1500 रुपयांसाठी संपूर्ण महाराष्ट्र ते दारूडा करणार असतील तर ते अत्यंत गंभीर आहे”, असं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
“काही राज्यात घरपोच दारू पोहोचवण्याची स्किम आहे. तीही आणण्याचं चाललं आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यासाठी काही करून दारू पोहोचवायची. बेवडे नवरे आणि भाऊ तयार करण्याचं काम सुरू आहे. हा सगळा प्रकार म्हणजे महाराष्ट्रासाठी कलंक आहे.त्यात अजित पवारांसारखा नेता असा विचार करत असेल तर ते दुर्देव”, असंही पुढे राऊत म्हणाले.
महिलांना डिसेंबरचे पैसे मिळण्यास सुरुवात
अजितदादांनी आता यशवंतराव चव्हाण, फुले, शाहू आंबेडकरांचे फोटो लावणं बंद करायला हवं, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. निवडणुकीच्या आधी कोणतेही निकष न लावता मतांसाठी पैसे वाटले.आता निवडणुका झाल्यावर निकष लावता, दारूची दुकाने वाढवत आहात. 1500 रुपयांसाठी आपल्या घरात कोणतं विष आणलं जात आहे, ते बहिणींनी पाहिलं पाहिजे, असंही राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
दरम्यान, विधानसभेच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलंय.त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या चार दिवसांत पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.
News Title – Sanjay Raut target mahayuti govt
महत्त्वाच्या बातम्या-
लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार का? आदिती तटकरेंनी दिलं उत्तर
“20-22 वर्षांची पोरं हवेत गोळीबार करतात, ‘गँग्स ऑफ बीड’चे धनी कोण?”
2100 की 1500?, येत्या चार दिवसात खात्यात येणार पैसे; महिलांनो ‘असं’ करा चेक
दुःखद घटना! लष्कराच्या गाडीला भीषण अपघात, ‘इतक्या’ जवानांचा जागीच मृत्यू
विनोद कांबळींच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे सरसावले, दिलं मोठं आश्वासन