“पाणी डोक्यावरून जात असेल तर त्याच पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल”
मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबतच्या बैठकीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना संजय राऊतांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे.
बैठकीत ज्या सूचना देण्यात आल्या आहेत त्याचं नक्की पालन होणार. शिवसेना (Shivsena) छातीवर वार झेलणारा आणि समोरून वार झेलणारा पक्ष आहे. पाठीमागून वार आमच्यात चालत नाहीत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
आतापर्यंत आम्ही सत्ता आणि सरकार असल्याने संयम बाळगला. पण आता जर पाणी डोक्यावरून जात असेल तर त्या पाण्यामध्ये आम्हाला इतरांना बुडवावं लागेल. मग त्यांना गटांगळ्या खाव्या लागतील, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
दरम्यान, आम्हाला लढण्यासाठी भाडोत्री लोक लागत नाहीत. आम्ही दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढत नाहीत. आमची हत्यारे आमचीच आहेत आणि ती धारदार आहेत. दोन घाव बसले की पाणी मागणार नाहीत, अशा शब्दात संजय राऊतांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
थोडक्यात बातम्या-
सभेच्या एक दिवस आधी राज ठाकरेंचा मोठा गौप्यसफोट, म्हणाले…
“उद्धव ठाकरे फोटोग्राफीमध्ये मशगुल होते तेव्हा राज ठाकरे बाळासाहेबांसोबत राज्यभर दौरे करत होते”
राज ठाकरेंच्या सभेआधी अमित ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
मुंबई पोलिसांचा राणा दांपत्याबद्दल धक्कादायक दावा, ‘ही’ माहिती समोर
नवऱ्यापासून वेगळं झाल्यानंतर राखी सावंतने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Comments are closed.