“हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक होते पण महाराष्ट्रात…”; ‘या’ नेत्याचा हल्लाबोल

Sanjay Raut | तेलुगु सिनेमा क्षेत्रातील सुपरस्टार अल्लू अर्जुन याला काही दिवसांपूर्वी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अटक करण्यात आली होती. अटकेच्या रात्रीच त्याला जामीनही मंजूर झाला होता. याच घटनेचा संदर्भ देत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर हल्लाबोल केलाय. महाराष्ट्रात सध्या बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत आहे. या प्रकरणातील काही आरोपी अजूनही फरार आहेत. यावरूनच राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारला धारेवर धरलंय.

हैदराबाद येथे अल्लू अर्जुन यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तीला अटक होऊ शकते पण महाराष्ट्रात दिवसाढवळ्या खंडणी मागणाऱ्याला संरक्षण दिलं जातंय, असं म्हणत राऊत यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. राऊत यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्वीट) एक व्हिडिओ देखील पोस्ट केलाय.

संजय राऊत पोस्ट-

संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पोस्ट करत टीका केली आहे. त्यांनी ‘एक्स’वर पवन कल्याण यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेता अल्लू अर्जुनला (Allu Arjun) अटक करण्यात आली होती. त्याचे आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी कौतुक केले होते. त्यांनी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांच्या कार्य पद्धतीचे कौतुक केले होते. हाच व्हिडिओ संजय राऊत यांनी पोस्ट केलाय.

या व्हिडिओत पवन कल्याण यांनी म्हटलं की, “रेवंथ रेड्डी हे मातीशी जोडलेले नेते आहेत. ते एक जबाबदार आणि नेहमी माहिती ठेवणारे नेते आहे. अल्लू अर्जुनप्रकरणी त्यांनी कायदेशीर कारवाई केली. अल्लू अर्जुनच्या ऐवजी मी असतो तर मला देखील त्यांनी अटक केली असती.” याच व्हिडिओचा संदर्भ देत संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी फडणवीस यांना टार्गेट केलंय.

“आपल्या महाराष्ट्रात काय चाललंय? एका हत्येस अप्रत्यक्ष जबाबदार ठरल्याने अल्लू अर्जुन या सुपरस्टारला अटक झाली. इकडे दिवसाढवळ्या खून, अपहरण, खंडणीचे गुन्हे करणाऱ्यांना सरंक्षण दिले जात आहे. हैद्राबाद येथे भाजपाचे राज्य नाही”, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.  त्यांनी फडणवीस सरकारला टोला लगावला.

नक्की कोण कुणाचा आका?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राऊत यांनी देशमुख हत्या प्रकरणी देखील एक ट्वीट केले होते. संतोष देशमुख यांच्या हत्येमागील मास्टरमाइंड हा वाल्मिक कराडच असल्याचा दावा केला जातोय. याच वाल्मिक कराडचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत राऊत यांनी गंभीर सवाल उपस्थित केले होते.  “व्वा! क्या सीन है? नक्की कोण कुणाचा आका?”, असं कॅप्शन त्यांनी फोटो पोस्टला दिलं होतं. त्यांची ही पोस्ट देखील तूफान व्हायरल झाली होती. अशात राऊत(Sanjay Raut) यांची ही नवी पोस्ट चर्चेत आली आहे.

News Title :  Sanjay Raut targets Devendra Fadnavis over Sarpanch murder case

महत्त्वाच्या बातम्या-

नवीन वर्षात सोनं स्वस्त झालं की महाग?, काय आहेत सध्या ग्रॅमचे दर?

सरकारला कोटींचा चुना लावत GFवर उधळले पैसे; अखेर ‘तो’ आरोपी अटकेत

सरपंच हत्या प्रकरणी फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय!

श्री स्वामींच्या कृपेने आज ‘या’ राशींची सगळी कामे सुरळीत पार पडतील!

धक्कादायक! ‘तो’ प्रयोग होऊ नये म्हणून कराडने केलं आजारपणाचं सोंग?