महाराष्ट्र मुंबई

वर्षभरापासून देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे- संजय राऊत

मुंबई | वर्षभरापासून देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्था संकटात आली होतीच. गेल्या वर्षभरापासून ही अर्थव्यवस्था ढासळली आहे, असं संंजय राऊत म्हणाले आहेत.

सध्याच्या घडीला भारत पाकिस्तान, काश्मीर प्रश्न, भारत चीन प्रश्न मागे सोडून कोरोनाच्या संकटाचा सामना करण्याची गरज आहे. राजकारण आजच्या घडीला सगळ्यांनीच बाजूला ठेवलं पाहिजे. पुढील दोन वर्षे तरी आपल्याला राजकारण करणं सोडावं लागेल. राजकारण करण्यासाठी बराच काळ आहे. तूर्तास कोरोनाच्या संकटाशी लढलं पाहिजे, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

सध्याचा काळ राजकारण करण्याचा काळ नाही तर कोरोनाच्या संकटाला सामोरं जाण्याचा काळ आहे. येत्या काळातही आम्हा सगळ्यांनाच राजकारण विसरून पुढे महाराष्ट्रासाठी काम करायचं आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार असलं तरीही सर्वाधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी योग्यच सांगितलं, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पुणे महापौरांच्या पायाला भिंगरी, कंटेन्मेंट भागात प्रत्यक्ष भेटी देऊन उपाययोजनांचे नियोजन!

…म्हणून सोलापूर महापालिका आयुक्त दिपक तावरे यांची बदली, त्यांच्या जागी या अधिकाऱ्याची वर्णी

महत्वाच्या बातम्या-

“कोरोना संकटकाळात नरेंद्र मोदी पंतप्रधान हे भारताचं सुदैव”

पुण्यातल्या झोपडपट्टीवर बुलडोझर फिरणार, महापालिका उभारणार नवी घरं…

“मोदींनी वर्क फ्रॉम होम करायला सांगितलंय म्हणून मुख्यमंत्री वर्क फ्रॉम होम करतायेत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या