मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना उत्तराखंडमधील मसुरीला आयएएस अकॅडमीच्या सांगता समारोपाला जायचं होतं. आठवड्यापूर्वी राज्यपाल कार्यालयाने मुख्यमंत्री कार्यलयाला परवानगी मागितली होती. मात्र मुख्यमंत्री कार्यलयाकडून परवानगी मिळाली नाही.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विमान प्रवासाला परवानगी नाकारल्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं. यावरून भाजप नेते आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भगतसिंह कोश्यारी हे गोव्याचेही राज्यपाल आहेत. त्यामुळे त्यांनी अधुनमधून गोवा सरकारचंही विमान वापरावं, असा टोला राऊतांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना लगावला आहे.
व्यक्तिगत कामासाठी सरकारी यंत्रणा वापरता येत नाही, हा नियम आहे. एरवी राज्यपालांना महाराष्ट्र सरकारकडून हेलिकॉप्टर आणि विमान कायम उपलब्ध करुन दिलं जातं. पण यावेळी तांत्रिक अडचणींमुळे तसे करता आलं नाही, असं राऊतांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावं अन्यथा…- उदयनराजे भोसले
“पुजा चव्हाण माझ्या मतदारसंघातील तरुणी, तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे”
प्रेमाच्या आठवड्यात त्यानं मृत्यूला कवटाळलं, प्रेयसीबद्दल लिहिल्या धक्कादायक गोष्टी
“…म्हणून राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला”
अन् भर संसदेत सुप्रिया सुळे म्हणाल्या…’निर्मलाताई, माझ्या दादाकडून अर्थखातं शिका’
Comments are closed.