बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपने आमचे आभार मानावेत; मोदींच्या मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा शिवेसना-राष्ट्रवादीचाच”

मुंबई | भाजपने शिवसेना, राष्ट्रवादीचे आभार मानले पाहिजेत. आमच्याकडून त्यांना जो पुरवठा झाला त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळासाठी चेहरे मिळाले, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

कपिल पाटील हे राष्ट्रवादीचेच प्रोडक्ट आहे. भारती पवारही राष्ट्रवादीच्याच होत्या. राणे तर शिवसेना, काँग्रेस करत भाजपमध्ये गेले. म्हणजे मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा हा शिवसेना-राष्ट्रवादीचाच आहे, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.

अनेक जुन्या जाणत्या नेत्यांना बाजूला ठेवून मोदी सरकारने नव्या चेहऱ्यांना जबाबदारी दिली आहे. अर्थात त्यांची क्षमता पाहूनच त्यांना जबाबदारी दिली आहे. या मंत्र्यांनी आता महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान द्यावं. मधल्या काळात लहान उद्योग मरून पडला होता. त्याला संजीवनी देण्याचं आव्हान राणेंसमोर आहे, असं राऊत म्हणाले.

शिवसेनेला फटका बसण्यासाठी त्यांना मंत्रीपद दिलं असेल तर तो मोदींच्या कॅबिनेटचा अपमान आहे. त्यांना देशाचं काम करण्यासाठी मंत्रीपद दिलं जातं. शिवसेना, राष्ट्रवादीला फटका देण्यासाठी किंवा जे राजकीय विरोधक आहे त्यांना फटका देण्यासाठी मंत्रीपद दिले जात असतील तर हे घटनाविरोधी आहे, असंही राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“जे पद मिळालं त्यापेक्षा राणेंची उंची मोठी, तरीही आमच्या शुभेच्छा”

आजारी असतानाही खडसे चौकशीसाठी हजर, म्हणाले ‘चौकशी मागे राजकीय हेतू आहे’

“एका चांगल्या व्यक्तीला बळीचा बकरा बनवण्यात आलं, बिचारे डॉ. हर्षवर्धन…”

मोठी बातमी! प्रकाश आंबेडकर रजेवर; प्रभारी अध्यक्ष म्हणून केली ‘या’ व्यक्तीची नेमणूक

राज्यात पावसाचं कमबॅक! ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More