“बांधावर पिकं आडवी झाली अन् सरकार…”

मुंबई | ऐन होळी (Holi) आणि धुळवडीतच (Dhulwad) राज्यातील विविध भागांना अवकाळी पावसानं झोडपलंय. त्यामुळे नागरिकांच्या उत्साहावर विरजण पडलंय. तर हाता-तोंडाशी आलेली पिकं डोळ्यादेखत नष्ट होताना पाहून शेतकऱ्यावर आभाळ कोसळल्याची स्थिती आहे.

औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, ठाणे, रायगड आदी भागात पावसाची रिपरिप सुरु झाली. तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी वीज पडून जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यावरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

विरोधक भांग प्यायले असे श्रीमान देवेंद्र फडणवीस म्हणतात… हा सुध्दा नशेचा अतिरेकी आहे. बांधावर पिकं आडवी झाली… शेतकऱ्यांच्या आयुष्याची धूळधाण झाली आणि सरकार धुळवडीच्या रंगात नाहून निघालं… ही सत्तेची चढलेली भांग नाहीतर काय?, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली आहे.

संजय राऊतांनी फडणवीसांचा रंगाने भरलेला फोटो शेअर केला आहे. तसेच राऊतांनी फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची आठवण करून देत खोचक टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-