नागपूर | राज्यात शिवसेनेच्या (Shivsena) शिवसंपर्क अभियानाला सुरूवात झाली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सोमवारपासून नागपुरात होते. तीन दिवस बैठकींचा सपाटा लावल्यानंतर संजय राऊत गुरूवारी मुंबईत परतले. मुंबईला परतण्यापूर्वी राऊतांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपवर सडकून टीका केली.
संजय राऊत यांनी भाजपवर (BJP) टीका करताना भाजप नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला. फडणवीस झोपेतही बडबडतात अन् बेडवरून पडतात, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. तर भाजपपासून दूर झाल्यामुळे आम्हाला संघटनात्मक त्रुटी जाणवायला लागल्या असल्याचंही राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस झोपेतही बडबडतात की, सरकार पडणार..पडणार.. अन् बेडवरून खाली पडतात, अशी भाजपची अवस्था आहे. त्यांना स्वप्नरंजनातून बाहेर पडायला हवं, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. तर आमचे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार, असा विश्वास देखील राऊतांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, सरकारला अडीच वर्ष झालेली आहेत. सरकार बनल्याच्या पहिल्या दिवसापासूनच उद्या पडणार, परवा पडणार, असे म्हणत अनेक तारखा देत आहेत. अडीच वर्षाचा कालावधी निघुन गेला, आणखी अडीच वर्षाचा कालावधी निघुन जाणार. आमचे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार, असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! PM Kisan योजनेत सरकारने केला ‘हा’ मोठा बदल
“ठाकरे सरकार म्हणजे खाऊंगा भी और खानेवालो की रक्षा भी करुंगा”
परमबीर सिंह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला झटका
“कोल्हापूरच्या रूग्णालयात मला मारून टाकण्याची योजना होती”
नितीन गडकरींच्या घोषणेनंतर पुण्यातील ‘हे’ दोन टोलनाके बंद होणार
Comments are closed.