“भाजप फक्त हूल देतं, त्याला वादळ नाही आदळआपट म्हणतात”
मुंबई | राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवरून राज्य सरकारवर टीका केली.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून आज भाजपवर सडकून टीका करण्यात आली आहे. 105चा आकडा असूनही सत्ता गमवली, हे शल्य भाजपच्या मनात असून आता माझी सटकली याच मानसिकतेने भाजप काम करत आहे, असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.
राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरेल, हे अधिवेशन गाजेल, अशी हूल भाजपकडून दिली जात आहे. मात्र, त्यामध्ये फारसे तथ्य नाही. आगामी अधिवेशनात भाजप सभागृहात गोंधळ घालणार असेल तर त्याला वादळ नाही फारतर फार आदळआपट म्हणावे लागेल, अशी खोचक टीका शिवसेनेने केली आहे.
दरम्यान, भाजपने दाऊदच्या नावाने भुई धोपटायचा प्रकार थांबवावा, असा सल्ला देखील आजच्या सामनातून देण्यात आला आहे. तर दाऊद भारताचा दुश्मन आहे. त्याचा खात्मा करण्याची जबाबदारी मोदी सरकारची आहे. त्यामुळे मोदी सरकारने कराचीत सर्जिकल स्ट्राईक करून दाऊदचा खात्मा करावा, असंही सामनातून सांगण्यात आलं आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला धक्का
“सरकार पडणार, सरकार पडणार, माझे 170 मोहरे फोडून दाखवाच”
“सत्ता येते सत्ता जाते पण सत्ता गेल्यानंतर कुणालाही इतकं अस्वस्थ पाहिलं नाही”
“सापाच्या पिलाला आम्ही 30 वर्षे दूध पाजलं, ते आता आमच्यावरच फुत्कारतंय”
मोठी बातमी! आणखी एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
Comments are closed.