बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“… त्यामुळे भाजपला माझी भीती वाटणं स्वाभाविक आहे”

नवी दिल्ली | ठाकरे कुटुंबाचे निकटवर्तीय व अनेक शिवसेना (Shivsena) नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून टीका करताना दिसत आहेत. त्यानंतर संजय राऊत यांनी मंगळवारी केलेल्या ट्विटमुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.

‘कभी कभी मौन सबसे अच्छा उत्तर होता है.. ‘,असं ट्विट करत आता आपलं उत्तर मौन असणार असल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी थोडा उशीरच केला, अशी खोचक प्रतिक्रिया भाजप (BJP) नेत्यांनी राऊतांच्या ट्विटवर दिली. संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मौन धारण केल्याच्या चर्चांवर स्पष्टिकरण दिलं आहे.

भाजपचे लोक ध चा मा करण्यात पटाईत आहेत. मी काल काही विषयांवर बोलणं टाळलं. एखाद्या विषयावर रोज बोललं पाहिजे असं नाही. पक्षाची भूमिका असते तेव्हाच आम्ही बोलतो, असं स्पष्टिकरण राऊतांनी दिलं आहे. तर भाजपला माझी भीती वाटणं स्वाभाविक आहे कारण मी जेवढं कमी बोलेन तेवढं त्यांच्या फायद्याचं आहे, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

दरम्यान, शिवसेना ही वाघाची गर्जना आहे आणि वाघ कधी मौनात जात नाही, असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत. तर भाजपचे लोक ज्या पद्धतीने सुडाने, द्वेषाने आणि बदल्याच्या भावनेने वागतात तसं शिवसेना कधी वागत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! कोरोना निर्बंधांबाबत ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय

मोठी बातमी! युक्रेनवरील आण्विक हल्ल्याबद्दल रशियाचं मोठं वक्तव्य

राजकीय वर्तुळात खळबळ! संजय राऊत आणि ‘या’ भाजप खासदारामध्ये 3 तास बैठक

मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू

“… पण मला वाटतंय आशिष शेलारांच्याच मेंदूला लकवा आलाय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More