नागपूर | शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. संजय राऊत यांनी नागपूरात येताच भाजप (BJP) नेत्यांवर सडकून टीका केली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वक्तव्यावरून राऊतांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे 22 तास काम करतात आणि दोन तास झोपतात. आता तर ते दोन तासही झोप येऊ नये यासाठी प्रयत्नशील आहेत, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. या वक्तव्याचा आधार घेत संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर टीकास्त्र डागलं आहे.
मोदी साहेब खूप काम करतात. ते फक्त दोन तास झोपतात हा चांगला प्रयोग आहे. मात्र आता उरलेले दोन तास सुद्धा त्यांना झोपू द्यायचे नाही असं बहुतेक महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी ठरवलं आहे, अशी टीका राऊतांनी केली. तर त्यानुसार भाजप नेते कामालाही लागले आहेत, असा टोला देखील राऊत यांनी लगावला आहे.
दरम्यान, भाजप-सेनेची युती तुटल्यापासून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (Shivsena) व भाजप (BJP) नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या-
जो बायडन यांच्या वक्तव्यावर रशियाची नाराजी, उचललं ‘हे’ मोठं पाऊल
धक्कादायक! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा रस्ते अपघातात मृत्यू
Russia Ukraine War: …म्हणून रशिया-युक्रेन युद्धात हस्तक्षेप करण्यास नाटोने दिला नकार
Cyclone Alert: पुढील 12 तास महत्त्वाचे, ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता
Sharmila Thackeray: शर्मिला ठाकरेंची शिवसेनेवर घणाघाती टीका, म्हणाल्या…
Comments are closed.